top of page

ठेपा........ | Thepa........

ssmblog1

आषाढी एकादशीला पढंरीच्या भेटीला नि घालेल्या ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांच्या पालखीचा सर्वात लांब पल्ला म्हणजे पुणे ते सासवड. पालखी सोडायला दरवर्षी बरेच पुणेकर मडंळी व आसपासच्या गाव/शहरांमधून माऊली, तुकोबांचे भक्त लाखोंच्या संख्येने या पायी प्रवासात मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात व ती एक प्रथा आहे. सुमारे दहा ते पधंरा लाख वारकरी या वारीत येतात. गेले दोन वर्षा पासून आम्ही कॉलेजचे मित्रही ( जवळ जवळ पन्नाशीला टेकलेले) या वारीत पालखी पोहोचवायला सामील होत आहोत. जीवनातील या आमच्या अनोख्या ठेप्याबद्दल लिहाव तेवढ थोडच. या वारीमध्ये जाण्याचा आम्हा मित्रांचा मूळ उद्देश स्वत:च्या शरीराची शाररीक क्षमता चाचणी करुन घेणे हा जरी असला तरी माऊलींच्या प्रतीची भक्ती व्यक्त करणेआणि त्यानांमोठ्या भक्तीभावाने पढंरीच्या वाटेला रवाना करण्यासाठी पुणे तेसासवड हे सुमारे ३७ किलोमीटर चे अतंर पालखीसोबत पायी जाणेहा सुद्धा आहे.

माझ्या सारख्या नास्तीक माणसाला या वारीत कसे जावेसे वाटते हा प्रश्न मागच्या वर्षी जेंव्हा माझ्या बरयाच मित्रांनी विचारला तेंव्हा माझ्याकडेयाच उत्तर नव्हत पण या वर्षी मी जेंव्हा वारकर्यां सोबत चाललो तेंव्हा मला त्या प्रश्नाच अचुक उत्तर मिळालय अस जरी ठामपणे सांगता नाही आल तरी मला वारीला जाण्याचा आनंद मात्र लटुता आला, जो मला गेल्यावर्षी लटुता आला नाही आणि म्हणनु या प्रवासाला मी माझ्या जीवनातील एक महत्वपुर्ण ठेपा आहे अस वारकरी भाषते सांगु शकतो कि ज्यात मला आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा याच उत्तर नक्की मिळाल.

या आधुनिक युगात सर्वसाधारणपणे तीन प्रकारची माणसे आपल्याला दिसतात. त्यातला पहीला प्रकार म्हणजे पूर्णपणे नास्तीक कि ज्यात मी स्वत: आहे. या वर्गामध्ये या वारीच्या बाबतीत अतीशय नकारात्मक गोष्टी ठासून भरल्या आहेत. परमेश्वराच अस्तीत्वच नाकारणारा हा वर्ग मग या अशा गोष्टीना विरोध करतो आणि स्वत: वारीला न येता ईतरांनाही येण्यापासनु परावृत्त करताना दिसतो. दुसरा वर्ग हा पुरोगामी. या वर्गा मध्येआणखीन दोन प्रकार, एक आस्तीक पुरोगामी आणि दुसरा नास्तीक. ही मंडळी साधारणपणे उच्चशिक्षीत असतात व त्यांच्या सर्व च्या सर्व कल्पना या सामान्य माणसापेक्षा वेगळ्या असतात. यांचेही या वारी बद्दल काही ठरावीक ठळक डायलॉग पूर्वी ऐकले होते . यांचा पहीला विचार म्हणजे परमेश्वर सर्वत्र आहे त्यासाठी वारीसारख्या ठिकाणी जाण ही अंधश्रद्धा वाटते किंवा आजपर्यंत किती जणाना विठ्ठलानेदर्शनर्श दि ल आहे? असा खोचक प्रश्न वि चारुन मी कि ती आधनु ीक वि चारांचा आहेहेसि द्ध करण्यासाठीची धडपड यांची सतत चालुअसतेथोडक्यात येनकेन प्रकारेन या दि डं ी सोहळ्याला टि केच लक्ष करुन नसु ती वाचाळ बडबड करणेहेया सर्वांचे मुख्य उद्दीष्ट असते आणि तिसरा प्रकार म्हणजे प्रतिगामी, याच्यामध्येही कट्टर आणि नुसता साधा प्रतिगामी असे दोन प्रकार. कट्टर पुरोगामी हे या वरील नास्तीक आणि पुरोगामी विचारांचा कडाडून विरोध करतात आणि जणुकाही सर्व समाजाच्या उद्धाराची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे किंवा जर खांदा नाही दिला तर तो धर्मच बुडेल अशी यांना सतत भिती वाटत असते. साधी पुरोगामी मंडळी ही शांतपणे याचा विरोध करत राहतात. या लोकांच्यामुळे फक्त एकच धोका सभंवतो तो म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी व लोकांची दिशाभुल. आणि खरी गोष्ट ही आहे कि जी कट्टर प्रतीगामी मंडळी आहे ही या वारीमध्ये कधीच समर्पणर्प करुन चाललेली दिसणार नाहीत हे विशेष. परंतु पुरोगामी विचारांचा व नास्तीकतचा प्रखर विरोध करणे हे काम मात्र ते चोखपणे बजावताना आपल्या आसपास दिसतात.

या तिनही प्रकारातील लोकांचा ईथे उल्लेख यासाठी केला कि या तिनही प्रकारच्या माणसानी या दिंडीमध्येसामील व्हावे आणि मग ठरवावे काय चुकआणि काय बरोबर. वारीमध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी, चुकीच्या पद्धती किंवा अनेक आपल्याला विश्वासही बसणार नाही अशा गोष्टी सर्वांनी ऐकल्या असतीलही पण तुर्तास ते सगळ बाजुला ठेवून या वारीमधील चांगल्या गोष्टी ज्या मला आढळल्या त्या ईथ उदृत करण्याचा प्रयत्न मी करतो. कारण समाजामध्ये जेंव्हा चार चांगल्या गोष्टी घडत असतात तेंव्हा त्याचबरोबर दोन गोष्टी वाईटही घडत असतात. समाजशुद्धीकरणाच्या प्रक्रीयेमध्ये सोबतच नवीन विषवल्ली जन्म घेणार हा निसर्ग नियमच आहे. त्यामुळे आपल्याला जे चांगल दिसल तेवढ घ्याव, असच संतांनीसुद्धा सांगीतल आहे.

वारीत चालायला सरुवात केली तेंव्हा माझ लक्ष मी नास्तीक असल्याने म्हणा माऊलींच्या पालखी दर्शनाकडे कधीच नव्हते, कारण त्यामध्ये मला फारस स्वारस्य नव्हत. माझ लक्ष प्रामुख्याने होत ते वेगगवेगळ्या दिंड्यामध्ये मध्ये चालणारी वयोवृद्ध मंडळी. वय वर्षे साठ आणि त्याच्या पुढे वय असणार्यांची संख्या लक्षणीय होती. आणि ही सर्व मडंळी ताठ कण्यातच चालत होती. यांच्या सर्वांच्या पायात साध्या वहाणा तर अनवाणी चालणारी मंडळीसुद्धा बरीच होती. अनवाणी चालणार्यांच्या तळपायाची कातडी एवढी जाड होती कि काटा सुद्धा यांच्या पायात घुसताना दहावेळा विचार करेल ईतकी टणक. कित्येकांच्या पायाला भेगा पडलेल्या. पण यांच चित्त फक्त अभांगाकडे टाळ, चिपळ्या, ढोलकी, विणेकर्याची तुण तुण या सर्वांच्या एकत्रीत पणामुळे प्रत्येक दिंडीमध्ये एक चैतन्वायाचे वातावरण दिसत होते. कुणाच्याही चेहर्यावर चिंतेची साधी लकेरदेखील नव्हती. ज्यांच्या हातामध्ये वारकरी झेंडे होते ते तर झेंडेनाचवत स्वत: त्या सोबत बेभान होवनु नाचत मार्गक्रमन करत होते. या झेंड्यांचा रंग ही धड भगवाही नव्हता. साधारणपणे विटकरी रंगात तो मोडत होता आणि तो डोळ्यांना देखील सौम्य वाटत होता. प्रत्येक दिंडीसोबत त्या त्या दिंडीचा चोपदार त्याच्या पारंपरिक पोषाखात सर्व दिंडीवर लक्ष ठेवनु होता. प्रत्येक दिंडीच्या सोबत त्यांच्या स्वत:च्या गाड्या होत्या व त्यात त्या दि डं ीची सर्वा त वयोवद्ृ ध माणसेबसलेली होती. त्यांच्या नजरा तर एवढ्या गर्वा नेसगळीकडेभि रभि रत होत्या कि त्यांच्या आयष्ुयातील आनदं ाचा परमोच्च बि दं ु त्यांनी या वारीत येउन मि ळवला आहेव हेजग जि कं लेआहेएवढा गर्व.र्व मलाच प्रश्न पडायचा कि ही माणस एवढी वयोवद्ृ ध, हि कशी काय एवढ्या दरु चालत जातील? एवढा वि चार डोकावताच तो मनष्ुय माझ्यापढु दहा पावल पोहोचलेला असायचा. एवढ्या प्रचडं आत्मवि श्वासानेचालणारी ही वयोवद्ृ ध मडं ळी पाहुन कोणालाही आश्चर्यचर्य वाटेल एवढा अजबु ा या दि डं ीमध्येपहायला मि ळाला. दि वेघाटातनु जाताना एक वाट मधनु शते ातनु जातेतो सरुवातीला शॉर्टकट वाटला म्हणनु आम्ही सद्ुधा ईतर वारकर्यां सोबत त्या दि शने ेगेलो. त्या मार्गा तील शवे टची चढण एवढी अवघड होती कि आमच्यातल्या सर्व मि त्रांची दमछाक झाली. एकाच्या छातीत दखु ुलागले. ती चढण चढताना तीन वेळा बसावेलागले. वि शषे म्हणजेया वाटेनेएक म्हातारी साधारण ७५ वयाची, डोक्यावर बोचक घेवनु आमच्यापढुेनि घनु ही गेली. अशी कि तीतरी म्हातारी माणस भरभर डोंगर चढताना दि सत होती आणि आम्ही जागोजागी तरुणांचेथवेवि श्रांतीला बसलेलेपहात होतो. काही दि ड्ं या दपुारी एक वाजण्याच्या समु ारास जेवण व थोडी वि श्रांती यासाठी थांबत होत्या तर काही सगळ उरकुन पढुच मार्गक्रर्ग मण करण्यासाठी सज्ज होत्या. यामध्ये एक वेगळी गोष्ट मी बघीतली ती अशी कि , प्रत्येक स्त्री परुुष वि श्रांतीनतं र रस्त्यावर पाऊल ठेवायचा तेंव्हा तो रस्त्याला या प्रमाणेनमन करायचा जसा एखादा कब्बडीपटुजेंव्हा वि रुद्ध बाजलु ा कब्बडी करत जातो तेंव्हा तो मध्यरेषले ा जसा हात लावनु नमस्कार करतो अगदी तस. एकदा का रस्त्याला नमस्कार केला कि पळत पळतच नि घायच. नमस्कार केल्यावर त्यांना काय शक्ती मि ळायची हेकदाचीत त्यांचेत्यानाच ठाउक. पण चमत्कार मात्र घडत होता हेमी उघड्या डोळ्यांनी पाहीलेआहे. त्यांच्या चेहर्या वर असेकाही भाव ब .cr.मी बघीतलेकी त्यांनी अमरपट्टा बांधला आहे. हि माणस आयष्ुयात कधी फार मोठ्या आजारान अथं रुणाला खि ळुन राहीली असतील असेवाटत नव्हत.े सगळीजरी साध्या पेहरावात असली तरी च.vेहरा सर्वां चाच तजेलदार वाटत होता. चालत असताना शजे ारुन एक Ambulance सायरन वाजवत आमच्या शजे ारुन नि घनु गेली तेंव्हा दि डीतील लोकांचा सवं ाद मी ऐकला त्यावरुन मला हेकळल कि त ्यातल्या बर्या च जणाना हेकोणत वाहन आहेहेमाहीतीच नव्हत. त्यात गेलेला पेशंट हा वारीतीलच शहरातील हौशी वारकरी असावा हेत्यात बसलेल्या ईतर जाड्या भरड्या नातवे ाईकांना पाहुन नक्की झालेहोत.े सकाळी साडेसहा वाजता नि घालेलो आम्ही मजल दरमजल करीत सध्ं याकाळी साडचे ारला सासवडला पोहोचलो व नतं र एसटी बसनेपण्ुयात पोहोचलो. तेंव्हा कदाचीत माउलींची पालखी ही दि वेघाटाच्या आसपास असावी. आमच्या सोबत अनेक दि ड्ं यामात्र एका मागोमाग एक अशा सासवड मक्ु कामी पोहोचत होत्या. सगळीकडे" चला माऊली चला माऊली, वाट द्या माऊली " याचाच पकु ारा ऐकुयेत होता. कुठेही भांडण नव्हत कि तंटा नव्हता. सगळ्यांच्या मखु ी फक्त आणि फक्त माउलीचेनाव आणि पढं रीचा ध्यास होता. आम्ही तर सर्वजर्व ण सासवड वरुन घरी जाणार होतो. परंतुया सर्व वारकर्या ना मात्र दसु र्या दि वशी पहाटे उठुन पढं रीची वाट धरायची होती.

ज्ञानेश्वर माऊलीना देखील कदाचीत हेच अभीप्रेत असाव म्हणनु वारी सरुु x झाली असावी आणि हा वारकरी सप्रं दाय जन्मास आला असावा. परंतुसप्रं दाय म्हटल कि पन्ुहा एक चौकट आली म्हणनु या चौकटीच्या बाहेर जावनु जो आनदं ही वारकरी मडं ळी मि ळवतेयापेक्षा दसु रा असीम आनदं मी तरी या जगाच्या पाठीवर आजपर्यंतर्यं कुठेही पाहीला नव्हता. हेवारकरी वर्षा नवुर्षे वारी करतात , पढं रपरुला जावनु मनोभावेवि ठ्ठलाचेदर्शनर्श घेतात. त्यांना कधी दर्शनर्श मि ळालेअसेल असेवाटत नाही असेमाझेमत जरी असलेतरी कुणाच्याही चेहर्या वर यक्तीचि तं ही खतं नव्हती. नामस्मरण करीत , अभगं म्हणत पढं रीला जाणे. तो भेटो अथवा ना भेटो त्याच्या भक्तीत ईतक तल्लीन व्हायच कि त्या पधं रा वीस दि वसात सपं र्णु र्णजगाचा वि सर पाडुन फक्त एकच ध्येय उराशी बाळगायच आणि त्याच्या भक्तीचा मनमरुाद आनदं लटुायचा एवढ एकच सर्वां ना माहीत असाव. आणि जीवनात नि र्मळर्म आनदं ज्याला नि सकं ोच मनानेलटुता येतो तो खरा जि वन जगतो बाकी नसु तेश्वास घेत असतात असे माझेठाम मत यावर्षी च्या वारी मध्येझाले. म्हणनु वरती म्हटल्या प्रमाणेही परुोगामी आणि प्रतीगामी मडं ळी यान्नी कि तीही आपलेवि चार मांडलेतरी त्यांना ईतका सदंुर आनदं लटुता येइल का ? असेमला सध्या वाटत आहे कारण ही मडं ळी स्वत:ला कुणाच्या स्वाधीन करतील असेनक्की नाही आणि स्वाधीन केल्याशि वाय आनदं शक्य नाही. तीच परीस्थीती रस्त्यानेवारकर्यां ची सेवा करणारेगावागावातील प्रतीष्ठीत व राजकारणी मडं ळींची ही होती . ती लोक वारकर्यां साठी भरपरु दान करीत होतेपण त्यांच्या चेहर्या वर कोणताही आनदं दि सला नाही कि ंवा पण्ुयकर्म करतोय असा ही भाव नव्हता, उलट मला पापमक्ुत कर अस म्हणत देवपजु ा करणारेदांभीक लोकांच्या चेहर्या वर हे भाव मी बर्या चदा टि पलेआहेत अगदी तसेच पापमक्ुतीचेभाव ही सेवा करणार्यां च्या चेहर्या वर मी पहात होतो , ति थे समाधान नव्हत. म्हणनु मी तरी मनाशी पक्क केलय कि मी कि तीही नास्तीक असलो तरी वारीला जाणार आणि वारकर्यां चा तो उत्साह , जोश , आनदं दरवर्षी एकदा या डोळ्यांनी पाहणार आणि मि त्रांच्या सहवासात सपं र्णु र्णदि वस घालवणार , कारण ती ही एक अमल्ुय देण आहेअसेमाझेमत आहे. आणि हाच माझा दरवर्षी चा एक महत्वाचा ठेपा असेल.

ll विठुमाउलीll


डॉ. संजय मोतलिंग

34 views

Commentaires


Drop Me a Line, Let Me Know What You Think

Thanks for submitting!

Dr. Sanjay Motling

 Marathi Blog

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! येथे  आम्ही आपल्याला नवीन आणि उत्तम माहिती देत राहू.  मराठी लेख I मराठी कविता

bottom of page