![](https://static.wixstatic.com/media/67d433_59eaf0a047cc493bbb1e494e1ca43c1f~mv2.jpg/v1/fill/w_980,h_649,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/67d433_59eaf0a047cc493bbb1e494e1ca43c1f~mv2.jpg)
पहाटे दोन वाजताची अंधारी रात्र. हो, ह्याला आपण पहाटच म्हणूया, कारण वेड्यांच्या कळपात सामील झालं की सगळ्या प्रहरा बदलतात. कोणतीही गोष्ट कधीही आणि कितीही करायची सवय लागून जाते. दिनांक १९ जानेवारी म्हणजे रविवारी पहाटे दोन वाजता अर्धवट झोपेतून अंथरूण सोडून दिलं आणि लिटरभर पाणी पिऊन बाथरूमात घुसलो. पाणी का प्यायचं हे आजही माहीत नाही पण सगळेच पितात म्हणून मी सुद्धा पितो. पाणी न पिता देखील सर्वकाही व्यवस्थित होतं ह्याची प्रचिती मला अनेकदा येऊन देखील मी पितो हेसत्य आहे. सर्वकाही व्यवस्थित उरकू न एक एक गोष्टी अंगावर परिधान केल्या आणि आवश्यक गोष्टी ( काही मानसिक गोष्टी सहित ) सोबत घेतल्या. समोर उभ्या ठाकलेल्या एका अजब युद्धासाठी मी सज्ज झालो आणि तशाच अंधारात बाहेर पडलो. फरक एवढाच कि, मी अशा युद्धाला बाहेर पडलो होतो, ज्याचं कोणालाही सोयरंसुतक नव्हतं. शेजारीपाजारी चुकू न जर जागेझालेअसतील तर झोपेतच त्यानं शिवी हासडली असेल आणि कदाचित म्हणालासुद्धा असेल कि, निघालं येडं!. कधी कधी ह्यामध्येघरातलेदेखील सामील असतात ह्याची मुद्दाम जाणीव करून देतो. तर अशा ह्या स्वयंघोषित लढाईला मी घराबाहेर पडलो. रस्त्यावर असेच चार वेडेमाझी वाटच पहात होते. मग आम्ही भाड्यानेठरवलेल्या एका गाडीमध्येबसून पहाटेचार वाजता इप्सित स्थळी पोहोचलो. मग नेहमी प्रमाणेज्यांनी जास्त पाणी पिलेलं असतं त्यांची टॉयलेट शोधण्याची घाई सुरु होतेआणि त्यांच्या पाठीमागेमलाही गेलं पाहीजेअसेमानसिक वाटणारेअसेसगळेच किमान दोनदा जाऊन आले....त्यात मी सुद्धा एक होतो. त्यानंतर थोडं हातपाय हलवून शरीर युद्धाला तयार करता करता सव्वापाच वाजलेआणि आम्ही युद्धाच्या आरंभरेषेला येऊन थांबलो आणि युद्ध सुरु झाले. होय, मी टाटा मुंबई मॅरेथॉन बद्दल बोलतोय.....
हेएवढंसं जरी प्रारंभिक वर्णन असलं तरी ह्याची मुहूर्तमेढ साधारण सात तेआठ महिन्यापूर्वी प्रत्येकानेबांधलेली असतेआणि त्याला अनुरूप सराव प्रत्येकानेप्रत्येकाच्या परीनं के लेला असतो. आम्ही मात्र लाईफ पेसर्सक्लब ह्या छोट्या संस्थेचेसर्वविद्यार्थी. डॉन सर उर्फ ज्ञानेश्वर तिडके ह्या एका हरहुन्नरी, उमद्या, शांत, सुस्वभावी इ. अनेक बिरुदं ज्यांना सहज चिकटवूशकतो अशी असामान्य आसामी म्हणजेआमचेशिक्षक आणि सेंट्रल पार्कची मोकळी हिरवळ आमची प्रशाला. ह्या संस्थेचेउदगातेडॉ. प्रवीण गायकवाड सर आणि त्यांची पत्नी डॉ. आरती तसेच ह्या प्रशालेच्या प्रशासनाची संपूर्णजबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहेअसेआमचेदेबूसर. ही संपूर्णआमची संपत्ती. वर्गातल्या मुला मुलींची बातच काही और आहे. तर असे आम्ही खारघर शाखेचेतीस पस्तीस जण आठवड्यातून चार दिवस ह्या वर्गखोलीमध्येसरावासाठी जमत होतो. डॉन सरांनी सर्वांकडून यथायोग्य व कसून सराव करून घेतला आणि आम्हाला पूर्णमॅरेथॉन ह्या जीवघेण्या स्पर्धेसाठी सक्षम बनवलं. सलग सहा महिनेसुट्टीचेसर्वदिवस पकडून हा सराव चालूहोता तो के वळ ह्याच स्पर्धेसाठी कि जी भारतातील सर्वात नावाजलेली मॅरेथॉन आहे. प्रत्येक रविवारी लांब पल्ल्याचं धावणं हेतर आमच्या पाचवीला पुजलेलं. प्रत्येक रविवार हा अंधाऱ्या पहाटेच सुरु व्हायचा. परंतुसर्वविद्यार्थी ( वेडे , पछाडलेले...... ई. ) मात्र न चुकता हजर असायचे. आणि ह्या संपूर्णप्रवासाची प्रचिती म्हणजे आम्ही सर्वत्या आरंभरेषेवर मोठ्या आत्मविश्वासानेउभेहोतो एका अनामिक, अनाकलनीय , अशाश्वत अशी स्पर्धा धावण्यासाठी.
स्पर्धासुरु झाली आणि मी धावायला सुरवात के ली एका सुनियोजित आराखड्यानुसार आणि धावत राहिलो. स्पर्धेचेपहिलेदोन तास ठरविल्याप्रमाणेठरवलेल्या वेळेत पूर्णके लेआणि वाटलं कि आता जमतंय. साधारण तेवीस किलोमीटर पूर्णके लेआणि पहिल्यांदा मनात नकारघंटा वाजून गेली पण मी जाणीवपूर्वक दुर्लक्ष के लेआणि तीस किलोमीटर पर्यंतचा टप्पा चार तासात पूर्णके ला. आता माझ्या आराखड्याप्रमाणेउर्वरित बारा किलोमीटरसाठी दीडतास म्हणजे९० मिनिटेशिल्लक होती. आणि हेसगळं जमेल असं वाटत होतं. मीच माझ्याशीच ठरवलेलंसाडेपाच तासात पूर्णकरण्याचं हेध्येय अंतिम टप्प्यात होतं. पण त्याच बरोबर शरीरानेहळूहळूत्याचेबंडखोर गुण दाखवायला सुरवात के ली होती आणि वेताळा सारखं त्यावर स्वार होतं तेमहाबंडखोर मन. माझ्या आत्मविश्वासाला हळूहळूएक एक सुरुंग लागायला लागला आणि मग मीच माझी समजूत घालायला लागलो कि, चला पाच तास नाही तर पावणेसहा तासात पूर्णकरूया. हि बंडखोर मनाकडून आलेली बंडखोर चेतावणी अगोदरच हवालदिल झालेल्या माझ्या कमकु वत मनानी मान्य के ली आणि काही क्षणातच माझी ध्येयं बदलली. त्यानंतर ईरादा ईतका कमजोर झाला कि आता थांबावं असं कधी कधी वाटत होत तर कधी कधी सर्वकाही सुरळीत व्हावं ह्यासाठी चक्क सावकाश चालायला सुरवात के ली. आणि सर्वात शेवटी बदललेलं टार्गेट हेसहा तास झालंआणि अतिशय महतप्रयासांन ही स्पर्धापूर्णके ली आणि मीच माझी समजूत घातली कि, आपली पहिलीच स्पर्धासहा तासाच्या आत पूर्णके ली हेही नसेथोडके.
आता मी सर्वमित्राना भेटलो आणि प्रत्येकानेविचारायला सुरवात के ली, कि किती वेळ लागला? त्या प्रत्येक प्रश्नागणिक माझी मानसिकता एका महत्तम अपराधी भावाकडेहळूहळूघसरू लागली आणि वाटायला लागलंआपण चांगलं करायला पाहीजेहोतं. आणि हेलिखाण ह्याच उद्देशानं के लं, कि हि स्पर्धाज्यांनी ठरवलेल्या वेळेत पूर्णके ली तेदेखील संपूर्ण खूष नव्हते. त्यांच्या मनात देखील थोडी कालवाकालव मी पाहत होतो. प्रत्येकाला हि गोष्ट नक्कीच शिवून गेली असणार की, मी नक्की चांगलं करू शकलो असतो किंवा थोडं पुश करायला पाहिजेहोतं. हेजरी खरं असलं तरी त्यावेळेस आपल्या मनावरती स्वार झालेला नकारात्मक भूमिका घेतलेला अजस्त्र वेताळ हा तुमचा पराभव करत असतो. आणि तुम्ही देखील त्या त्या वेळेला तुमच्या तलवारी म्यान करून त्याला शरण जाता आणि स्वतःचा स्वतःशीच पराभव करून घेता. ज्यांनी समाधानकारक कामगिरी के लेली असतेत्यांच्या चेहऱ्यावर देखील एक निराशेची झालर तिथेपाहायला मिळते. ती अशी कि, त्याच्या पेक्षा माझा टाईम चांगला यायला हवा होता. परंतुजगात तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी असणारच असतो. परंतुतो अनामिक असला तर चालेल पण ज्ञात कोणी नसावा हा एक मनुष्यस्वभाव प्रत्येकात असतो आणि त्याच्या ओळखीचा कोणीतरी त्याच्यापुढेगेला ह्या दुः खाला तो कवटाळून बसतो. हेसर्वस्पर्धासंपल्यानंतर तिथेचालूअसतं. सर्वजण शेवटी पुन्हा गळ्यात हात घालून फोटो काढतात आणि त्यादिवशीचा त्यांचा हा इव्हेन्ट संपूर्णदिवसभर सोशलमिडीयावर एखाद्या चित्रपटासारखा दिवसभर प्रदर्शित होत असतो.
हेसर्वदरवर्षी होत असतंआणि हेच होतं असतं. तरी देखील ह्यातला प्रत्येकजण ह्याच जीवघेण्या स्पर्धेत दरवर्षी उतरत असतो. प्रत्येकाचंध्येय निश्चित के लेलं असतं. बऱ्याच जणांचंसुप्त असतं तर बर्याच जणांचं उघड उघड असतं. पण स्पर्धाअसतेहेनिश्चित. स्पर्धा स्वतःशीच करावी हा जरी पुस्तकी तर्क असला तरी हि वस्तुस्थिती नक्की आहेकि तो नकळत कोणाशीतरी स्पर्धाकरतोच करतो. आणि हा मनुष्य स्वभाव देखील आहे. नकारात्मक बाबींचा शिरकाव झाल्यानेच तुम्ही हारता हेजरी सत्य असलं तरी तेस्वीकारार्हअसावं कारण नकारात्मक मन हा सुद्धा तुमच्या शरीराचाच भाग आहे. आणि मनाची हि अवस्था प्रत्येकाची वेगळी वेगळीच असणार म्हणूनच स्पर्धाकोणीतरी एकच जिंकत असतो. ह्या नाकारात्मकतेत एक गोष्ट निश्चित सकारात्मक असतेती म्हणजेह्या स्वतःशीच हारण्यानेप्रस्थापित झालेली जिंकण्याची नवीन उर्मी आणि त्यामुळेनव्याने मांडलेला नवा डाव.... पुन्हा एकदा हरण्यासाठी. कारण तुम्ही जर हारला नाहीत तर जिंकता कसं येणार ? आणि जिंकलात तर स्पर्धासंपली. कोणीतरी म्हटलेलं एक वाक्य मुद्दाम इथेउदृत करावं वाटत की . विषमता ज्या दिवशी संपेल त्यादिवशी उत्क्रांती थांबेल. आणि आपल्याला उत्क्रांती थांबवायची नाही. आपल्याला जिंकायची आहेती एकच गोष्ट आणि ती म्हणजेनिसर्गाने जगण्यासाठी आणि जगताना आनंद उपभोगण्यासाठी केंव्हातरी संपणारेहे निकोप, निरोगी आणि निरंतर सुंदर शरीर. आणि त्यासाठी करायची आहे सातत्यपूर्ण तयारी कि ज्यामुळेप्रत्येक मॅरेथॉन तितक्याच ताकदीनेधावता येईल कि ज्यामुळेपुन्हा वाटलं पाहीजेकी," अरेरे ..... मला अजून चांगलं करता आलं असतं".
डॉ. संजय मोतलिंग
( २०.०१.२०२०)
Comentarios